समतेच्या नगरीत न्याय पर्व सुरू
कोल्हापूर : कोल्हापूरकरांच्या चार दशकांहून अधिक काळाच्या प्रतीक्षेला अखेर आज पूर्णविराम मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाची सर्किट बेंच कोल्हापूर येथे सुरू झाले असून, याचे भव्य उद्घाटन रविवारी दुपारी 3 वाजता मेरीवेदर ग्राऊंड येथे पार पडले. आज सोमवार पासून तब्बल 90 हजार न्यायिक प्रकरणे घेऊन हे सर्किट बेंच कामकाजाला प्रारंभ करणार आहे.
या ऐतिहासिक सोहोळ्यास भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्किट बेंच 18 ऑगस्टपासून कार्यान्वित होणार असून, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यातील प्रकरणांची सुनावणी येथे होईल. प्रारंभी 90 हजारांहून अधिक प्रकरणांचे हस्तांतरण अपेक्षित असून, यामध्ये निवडणूक व करासंबंधी अनेक महत्त्वाची प्रकरणे समाविष्ट आहेत. उद्घाटन सोहोळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेने शहरात मोठ्या प्रमाणावर साफसफाई, रस्त्यांची दुरुस्ती, पार्किंग व वाहतूक व्यवस्थेची विशेष तयारी केली. यासाठी सुमारे 85 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.कोल्हापूरमध्ये बेंच सुरू झाल्याने स्थानिकांना न्याय मिळवण्यासाठी मुंबई किंवा औरंगाबादला धाव घ्यावी लागणार नाही. त्यामुळे वकील, फिर्यादी व सामान्य नागरिकांचा मोठा दिलासा झाला आहे.
दीडशे वर्षांपूर्वीचे कौटुंबिक न्यायालय!
सर्किट बेंचसाठी 9 हेक्टर 18 गुंठे जागा शेंडा पार्क मध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे. या जागेसाठी शासनाची मान्यता मिळवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे असे जिल्हाधिकारी अमोल शेडगे यांनी सांगितले.
कोल्हापूर, उच्च न्यायालय, सर्किट बेंच, दिमाखात न्यायार्पण, Daily Sagar, Dainik Sagar
समतेच्या नगरीत | न्याय पर्व सुरू | सरन्यायाधीश भूषण गवई | पार्किंग वाहतूक | Daily Sagar | Dainik Sagar