खा. सुनिल तटकरे यांना लंडन येथे ‘भारत भूषण’ पुरस्कार प्रदान

माणगाव (अरुण पवार) : रायगड – रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि केंद्रीय इंधन समितीचे अध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांना दैनिक ‘लोकमत’ या आघाडीच्या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या ग्लोबल इकॉनॉमिक कनव्हेशनमध्ये त्यांनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, नाट्य, साहित्य अशा विविध प्रकारच्या क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रभावी योगदानाची दखल घेऊन बहुआयामी व्यक्तीमत्व खासदार सुनिल तटकरे यांना प्रतिष्ठीत अशा ‘भारत भूषण’ पुरस्काराने लंडन येथे गौरविण्यात आले.
गेल्या 45 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत खासदार सुनिल तटकरे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदे भुषवून शोषित आणि वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. ते चार वेळा वेळा आमदार तर दोन वेळा खासदार झाले आहेत. प्रचंड जनसंपर्क आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असून प्रशासनाचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात अर्थ आणि नियोजन, नगरविकास, जलसंपदा, अन्न आणि नागरी पुरवठा असे विविध मंत्री पद सांभाळून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व प्रकारच्या शासकीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. एक प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांना ओळखले जाते.या सामाजिक कार्याची दखल घेऊन खासदार सुनिल तटकरे यांना भारत भूषण या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या सन्मान सोहोळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने माझी जबाबदारी अधिक वाढली आहे असे खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितले.

खा. सुनिल तटकरे, लंडन, ‘भारत भूषण’, पुरस्कार, Daily Sagar, Dainik Sagar

खा. सुनिल तटकरे |लंडन | ‘भारत भूषण’ | पुरस्कार | Daily Sagar | Dainik Sagar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *