खरीप हंगामात शेतकऱ्यांनी चांगली पीक घ्यावीत यासाठी राज्यातील कृषी विभागाने विविध प्रयोग केले आहेत. मावळ भागात यंदा नाचणीचं पीकं जोमात आलं आहे.पुणे जिल्ह्यातील मावळ (PUNE MAVAL) तालुक्यात शिळीम्ब (SHILIMB) येथे नाचणी पीक (ragi crop) जोमात आल्याचे पाहायला मिळत आहे. मावळ तालुक्यात भात पिकानंतर खरीप हंगामात नाचणी हे पीक महत्वाचे आहे. पूर्वीची लोक नाचणीचा उपयोग आहारात करत होते. परंतु आता नाचणी पीकाचे क्षेत्र कमी झाले असून आहारात याचा उपयोग कमी होत आहे. कृषी विभागाने यावर्षी नाचणीच्या बियाणांचे शेतकऱ्यांना वाटप केले होते. नाचणीच्या बियाणांची पेरणी सुध्दा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली होती. कृषी विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची सगळीकडं चर्चा सुरु आहे.