पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. पुढील वर्षी लोकसभा 2024 निवडणुकीसाठी केंद्र सरकार आतापासून तयारी करत आहे. दिवाळीपूर्वीच हे गिफ्ट देण्यात येणार आहे. ही घोषणा झाल्यास त्याचा परिणाम पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. एका सरकारी अधिकाऱ्यानुसार, पीएम किसान योजनेतील (PM Kisan Samman Nidhi Scheme) या बदलाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर 20,000-30,000 कोटी रुपयांचे ओझे सरकारच्या तिजोरीवर पडेल.