पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील लाभर्थ्यांना सध्या 15 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 27 जुलै रोजी हा हप्ता एक कळ दाबून जमा केला होता. राजस्थानमधील सीकर येथे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना 14 व्या हप्त्यातंर्गत 17000 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. ही रक्कम 8.5 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पोहचली होती. तर त्यापूर्वी 13 वा हप्ता फेब्रुवारी 2023 मध्ये जमा करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना पुढील हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नाहीतर ही रक्कम जमा होणार नाही.