आत्तापर्यंत डाळिंबाला प्रतिकिलो मागील १५ दिवसात मिळालेला हा सर्वात जास्त दर असल्याचा दावा शेतकरी आणि व्यापाऱ्याने केला आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील युवा शेतकरी रमेश गाडेकर यांनी आपल्या शेतात विविध प्रकारच्या डाळिंबाची बाग फुलवली आहे. रमेश गाडेकर बुधवारी आपली डाळिंब राहाता बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन आले. पण त्यांना अपेक्षेपेक्षाही जास्त भाव मिळाला. इतर डाळिंबाला सरासरी, तर भगवा व्हरायटिला हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा करता प्रतिकिलो ८०० रुपयांचा दर मिळाला आहे. या व्हरायटीच्या 26 किलो डाळिंबाला 16 हजार रुपये मिळाल्याने शेतकऱ्याने आनंद व्यक्त केला आहे. राहाता बाजार समितीत शेतकऱ्याच्या डाळिंबाला उच्चांकी ८०० रुपये प्रति किलो दर सध्या मिळतोय.