कार्मेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष व आदिवासी मुलांसोबत साजरा केला इकॉफ्रेंडली रक्षाबंधन

carmel-school-students-celebrated-eco-friendly-raksha-bandhan-with-trees-and-tribal-childrenDaily Sagar

इकोफ्रेंडली रक्षाबंधन वृक्षासोबत व आदिवासी मुलासोबत

कार्मेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष व आदिवासी मुलांसोबत साजरा केला इकॉफ्रेंडली रक्षाबंधन

पेण(प्रशांत पोतदार): रायगड जिल्ह्यातील पेण येथे अंकूर ट्रस्टच्या आदिवासी आश्रमातील विद्यार्थ्यांनी कार्मेल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत मिळून एक आगळावेगळा आणि अर्थपूर्ण इको-फ्रेंडली रक्षाबंधन साजरा केला. राखी केवळ नात्यातील बंधांची आठवण नाही, तर निसर्ग आणि आदिवासी संस्कृतीच्या रक्षणाचाही संदेश देणारा असावा, असा उद्देश यामागे होता.
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाडांना राखी बांधून करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.
वैशाली पाटील उपस्थीत होत्या.
आदिवासींचे खरे रक्षण हे डोंगर, दऱ्या, झाडी आणि जंगलच करतात. म्हणून आम्ही निसर्गाला राखी बांधून रक्षा बंधन साजरे करतो असे यावेळी त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाला तरणखोप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश पाटील, राज पाटील, कार्मेल शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सोफाया, प्रतीक्षा कदम, साक्षी टीचर, लंकेश गवस, आणि हेमा घरत हे मान्यवर उपस्थित होते.
Carmel School students celebrated eco-friendly Raksha Bandhan with trees and tribal children
कार्मेल स्कूल,  आदिवासी मुलांसोबत,  इकॉफ्रेंडली, रक्षाबंधन, Dainik Sagar, Daily Sagar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *