महागाईने कंबरडे मोडलेल्या पाकिस्तानमधील नेत्यांना भारताशी युद्ध करायचे आहे. सध्या पाकिस्तान जागतिक समूदायाकडे मदतीसाठी कटोर घेऊन फिरत आहे. तर येथील नेते जनतेला भारताविरुद्ध युद्ध करण्यासाठी भडकावत आहेत. पाकिस्तान मुस्लीम लीगचा (एन) नेता कॅप्टन सफदर याने एका सभेत भारतासह इस्त्राईलवर अणुबॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. तर पाकिस्तानच्या मुस्लीम जनतेने भारताविरुद्ध गजवा-ए-हिंदसाठी तयार राहण्याचे त्याने आवाहन केले आहे. पाकिस्तानमध्ये लवकरच निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे भडकाऊ भाषणं करण्यात येत आहेत.