गाझातील एका रुग्णालयावर मंगळवारी रॉकेट हल्ला झाला. यात जवळपास 500 जणांचा मृत्यू झाला आहे. लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इस्रायल दौऱ्यावर येणार होते. बरोबर त्याच्या एकदिवस आधी हा हल्ला झाला. पॅलेस्टाइनने या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरलय. पॅलेस्टाइनच्या अथॉरिटीने इस्रायली संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते हनन्या नफ्ताली यांच टि्वट शेयर केलय. “इस्रायलने रुग्णालयावर हल्ला केला, ज्यात हमासचे अनेक दहशतवादी मारले गेले” असं स्पष्टपणे म्हटलं होतं. इस्रायलने शेअर केलेले व्हिडिओ सुद्धा डिलीट करण्यात आले. इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, मागून येणार रॉकेट रुग्णालयावर कोसळलं. अमेरिकेने सूत्रांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारावर इस्रायलला रुग्णालय हल्ल्याच्या आरोपातून मुक्त केलं आहे.