आपला मूड कसा आहे याचा फक्त आपल्या आरोग्यावरच नव्हे तर आसपासच्या लोकांवरही परिणाम होता. म्हणजे तुम्ही छान, रिलॅक्स मूड (relax mood) मध्ये असाल तर सगळ्यांनाच आवडता पण जर तुमची सतत चिडचिड होत असेल, किंवा दु:खी रहात असाल तर लोक तुमच्यापासून दूर राहणंच पसंत करतात. कधीकधी काही प्रॉब्लेम्समुळे मूड खराब होतो, पण खराब मूडची ही समस्या कायम असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणे महत्वाचे ठरते. मूड चांगला (good mood) ठेवण्यासाठी, दैनंदिन दिनचर्या तर सुधारायला हवीत पण त्यासोबतच काही पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.