उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यातही बऱ्याच जणांना खूप घाम (sweat) येतो आणि त्यामुळे शरीराला दुर्गंधही (body odour) येतो. घामामुळे येणारा दुर्गंध टाळण्यासाठी बहुतेक लोक परफ्यूम आणि डिओड्रंट्सचा (Deodorant) वापर करताना दिसतात. तर काही लोकं पॉकेट डिओदेखील वापरतात. पण डिओड्रंटमध्ये असलेले पॅराबेन आणि ॲल्युमिनियमसारखे घटक आपल्या शरीराचे अनेक प्रकारे नुकसान करतात.