दुकानातून तूप खरेदी करणं अत्यंत महागात पडतं. त्यातही शुद्ध तूप मिळेल की नाही याची काही शाश्वती नसते. त्यामुळे मग गावावरून येणाऱ्या नातेवाईकांना तूप आणायला सांगितलं जातं. तेही वेळेत येतील की नाही याची शाश्वती नसते. अशावेळी तुपाची तातडीची गरज असेल तर अडचण होते. कधी कधी गृहिणी घरातच दूधाच्या मलाईपासून तूप काढतात. एकाच भावात दूध आणि तूप दोन्ही मिळतं. पण वेळेच्या अभावी लोकांना असं करणं शक्य नसतं. कारण घरच्या घरी तूप तयार करण्याची पद्धत अत्यंत किचकट असते. ही वेळ खाऊ प्रक्रिया असते. शिवाय मेहनतही खूप लागते. अशावेळी अवघ्या काही मिनिटात घरच्या घरीच तूप तयार करता आले तर…?