आजकाल सगळं इन्स्टंट मिळतं, मग ते काहीही असो. फास्ट आयुष्यात आपल्यालाही फास्ट जे मिळेल ते हवं असतं. हातात फोन आहे, इंटरनेट आहे आपण सगळं पटापट मागवू शकतो. मग आपोआपच आपण खाण्यापिण्यात सुद्धा जे इन्स्टंट असेल तेच निवडतो. असेच काही इन्स्टंट फूड जे तुम्हाला माहिती असायलाच हवेत. चला बघूयाइन्स्टंट नूडल्स: आपल्याला सगळ्यांना मॅगी चांगलीच माहित आहे. मॅगी इन्स्टंट फूड आहे. दोन मिनिटांत मॅगी बनते याची क्रेझ काही वेगळीच असते. आता आयुष्य फास्ट झालंय, सगळ्या गोष्टी लोकांना इन्स्टंट हव्या असतात. मग खायच्या गोष्टी सुद्धा लोकांना तशाच लागणार. मॅगीची क्रेझ बघून अनेक इन्स्टंट नूडल्स मार्केट मध्ये आले. यात काही पौष्टिक नूडल्सचा देखील समावेश आहे. इनस्टंट फूड मध्ये नूडल्स हा एक चांगला पर्याय आहे.