अजित पवार गटाचे 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाला खिंडार पडणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. अजितदादा गटाचे कोणते आमदार शरद पवार यांच्या गटात सामील होणार अशी चर्चा रंगायलाही लागली. मात्र, ही चर्चा रंगण्यापूर्वीच अजितदादा गटाच्या एका मंत्र्याने मोठा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. जयंत पाटीलच आमच्या संपर्कात आहेत, असा दावाच या नेत्याने केल्याने खळबळ उडाली आहे.