ड्रग्जमाफिया ललित पाटील याला अटक झाली आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलेत. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केलेत. मुंबई आणि पुण्यात आतापर्यंत 700 ते 800 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त झालं आहे. यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावं. ललित पाटील हा केवळ एक मोहरा आहे. या ललित पाटील प्रकरणाचा गैरवापर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणासाठी करत आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत.