राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींनी पॅलेस्टाईनची बाजू घ्यायला हवी होती असं म्हटलं. ज्याचे पडसाद आता भाजपाकडून उमटत आहेत. भाजपाच्या नेत्यांकडून शरद पवारांवर कडाडून टीका केली जाते आहे. तर दुसरीकडे सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर ठाकरे गट हे विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. पुण्यात आयकर विभागाने नीळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तर तिकडे मनोज जरांगे पाटील यांनी पुढचं आंदोलन झालं तर ते सरकारला झेपणार नाही असं म्हटलं आहे. या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून असणार आहे.