ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे वारंवार शिंदेगटावर निशाणा साधतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीकास्त्र डागतात. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना खासदाराने उत्तर दिलं आहे. संजय राऊत जे बोलतात. त्याच प्रकारचा तो माणूस आहे. ज्याचे संस्कार जसे त्याच प्रकारे शब्द आचरणात आणि उच्चारात येतात. चांगल्या संस्कारात वाढलेला माणूस कधीही चुकीचं बोलत नाही, असं म्हणत शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.