रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील चौथा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील चौथा सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे. टीम इंडियाने याआधीच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुप्पट आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश आहे. बांगलादेशने 3 पैकी फक्त 1 मॅच जिंकली आहे. टीम इंडियाच्या तुलनेत बांगलादेश निश्चित कमजोर आहे. मात्र त्यांना गृहीत धरण्याची चुक रोहितसेना करणार नाही. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना कधी होणार, कुठे पाहता येणार, हे सर्वकाही जाणून घेऊयात.