वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली आहे. भारताने तीन पैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताला गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. भारताचा पुढचा सामना बांगलादेशसोबत आहे.वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया चांगल्या फॉर्मात आहेत. सलग तीन सामने जिंकल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वासही वाढला आहे. भारताचे खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत. विराट कोहली यानेही जबरदस्त कामगिरी केली आहे.