आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. बांगलादेश या निमित्ताने टीम इंडिया विरुद्ध भारतात तब्बल 25 वर्षांनी वनडे सामना खेळणार आहे. बांगलादेशने याआधी टीम इंडिया विरुद्ध भारतातील अखेरचा सामना हा 1998 साली खेळला होता. त्यामुळे बांगलादेशसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत सलग 3 सामने जिंकले आहेत. तर बांगलादेशने 3 पैकी 2 सामने गमावून एक जिंकला आहे. पुण्यात गुरुवारी हवामान कसं असेल हे आपण जाणून घेऊयात.