अफगाणिस्तानने ढिसाळ बॅटिंग आणि खराब फिल्डिंगच्या जोरावर न्यूझीलंड विरुद्ध 149 धावांनी सामना गमावलाय. न्यूझीलंडने वर्ल्ड कपमधील सलग चौथा विजय मिळवला आहे. न्यूझीलंडचा मिडल ऑर्डर फ्लॉप ठरल्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि कॅप्टन टॉम लॅथम या जोडीने पाचव्या विकेटसाठी 144 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडने या भागीदारीच्या जोरावर 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 288 पर्यंत मजल मारत अफगाणिस्तानला विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं. मात्र अफगाणिस्तानने फ्लॉप कामगिरी करत न्यूझीलंडसमोर गुडघे टेकले. अफगाणिस्तानने 34.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 139 धावा केल्या. अफगाणिस्तानचा हा या स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला.