एक साधं गुगल सर्च तुमचं बँक खाते रिकामे करु शकते. तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल. पण देशात अशा अनेक गुन्हे घडले आहे. गुगलवर कोणत्याही गोष्टीची सहज माहिती मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षात गुगलवर सर्च करण्याचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्हेगारांसाठी गुगल हे एक प्रकारचे कुरण आहे. तिथे कोणी ना कोणी त्यांच्या गळाला लागतोच. युझर्सची एक चूक त्यांच्या कमाईचे साधन ठरते. त्यामुळे गुगल सर्च करतना सावध रहा. सर्चिंग करताना तुम्ही सावज होणार नाही, याची काळजी घ्या. या गोष्टी सर्च करताना तर विशेष काळजी घ्या.