जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अब्जाधीश एलॉन मस्क याने गेल्यावर्षी ट्विटरचा ताबा घेतला. त्याचे नामकरण एक्स केले. तो आल्यापासून भराभर प्रयोग सुरु झाले. हजारो कर्मचारी सोडून गेले अथवा त्यांना नारळ देण्यात आला. लोगो बदलला. पेड व्हर्जन आले. तुफान बदल झाले. कार्यालये बंद झाली. कार्यालयातील खुर्च्यापासून ते इतर सामानाचा लिलाव झाला. आता एक्स वापरण्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहे. त्याचा श्रीगणेशा या दोन देशांपासून सुरु झाला आहे. का करण्यात येत आहे हा प्रयोग?