आजकाल लोकं एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहोचण्यासाठी गुगल मॅपचा अधिक वापर करत आहेत. हे अॅप अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना मार्ग आठवत नाहीत किंवा नवीन ठिकाणी भेट द्यायला आवडते. गुगल मॅप (Google Map) हा जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन गुगलचा एक भाग आहे. नवीन वैशिष्ट्ये आणि सेवांसह, गुगल मॅप देखील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनू लागला आहे. हे लक्षात घेऊन गुगलही त्यात सातत्याने सुधारणा करत आहे. जर तुम्हीही गुगल मॅपवरून प्रवास करत असाल किंवा तसे करायचे असेल, तर हे अॅप आपल्याला योग्य ठिकाणी कसे घेऊन जाते आणि या अॅपला जाम कसे कळते?