करंजा : मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली असून करंजा बंदरातील मासळी बाजाराला सुरुवात झाली आहे. या बाजारात गतवष 500 तर यावष 600 कोटींच्या मासळीची विक्रमी उलाढाल होण्याची अपेक्षा मच्छिमारांनी व्यक्त केली आहे. 1 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या हंगामात घाऊक बाजारात 20 बोटीतून आलेल्या दोन कोटींच्या मासळीची विक्री केली जात असल्याची माहीती करंजा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली आहे. 15 ऑगस्ट 2024 ला स्वातंत्र्य दिनी नव्याने निर्माण झालेल्या करंजा मच्छीमार बंदरातून मासळी विक्री सुरू झाली आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत बंदरातून 50 कोटींच्या 500 टन मासळीची निर्यात झाली होती. यात यावष वाढ झाली आहे.
करंजा बंदरातील मासळी ही मासळी अमेरिका,चीन थायलंड तसेच आशिया व युरोप खंडातील अनेक देशात निर्यात करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मासळी बंदर आणि त्यावर आधारित विविध प्रकल्पांमुळे करंजा परिसरात विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या उद्योगात वाढ होत चालली आहे. त्यामुळे येथील स्थानिक बेरोजगारांना बऱ्यापैकी रोजगारही उपलब्ध होऊ लागला आहे. मुंबईच्या ससून बंदराला पर्याय म्हणून उरणच्या करंजा येथे नवे मच्छिमार बंदर उभारण्यात आले आहे. त्यामुळे येथील मच्छिमारांना लाभ झाला आहे. त्याच बरोबरीने स्थानिकांच्याही व्यवसायात भर पडली आहे.
अरबी समुद्र किनाऱ्यावर द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी करंजा गाव सात पाड्यात वसलेले आहे.30 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या चाणजे ग्रुप ग्रामपंचायत कार्यरत आहे. 17 सदस्य असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. प्रामुख्याने कोळी बांधवांचीच सर्वाधिक वस्ती आहे. यामुळे मासेमारी व्यवसाय करणे ओघाने आलेच.मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांमुळे राज्यातील सात सागरी जिल्ह्यातील सर्वात मोठे मच्छीमार करंजा गाव म्हणून ओळखले जाते.
करंजा, बंदरात, मासळीची, 600 कोटींची विक्रमी उलाढाल, वाढत्या निर्यातीमुळे, निर्यातीचे नवे केंद्र, Daily Sagar, Dainik Sagar
करंजा | बंदर | मासळी | 600 कोटींची विक्रमी उलाढाल | वाढत्या निर्यातीमुळे | निर्यातीचे नवे केंद्र | Daily Sagar | Dainik Sagar